पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा : दक्षिण कोरियाचा १५७ गुणांनी धुव्वा, नसरीन शेख सामन्याची मानकरी
नवी दिल्ली, १४ जानेवारी-
टीम इंडियाच्या महिला संघाने पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेची दणदणीत विजयी सलामी दिली. नसरीन शेख या सामन्याची मानकरी ठरली.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या दिवशी पुरुष संघाला नेपाळविरुद्ध निसटता विजय मिळाल्यानंतर महिला संघाने सलामीच्या सामन्यात गुणाचे पावणे दोन शतक पार करीत दक्षिण कोरियाचा १७५ विरुद्ध १८ असा १५७ गुणांनी अक्षरशा धुव्वा उडवित मकर संक्रांत साजरी केली.
पहिल्या डावातील पहिल्या सत्रात १०-२, दुसऱ्या सत्रात ९४-१० तर दुसऱ्या डावातील तिसऱ्या सत्रात ९७-१८ आणि अंतिम सत्रात १७५-१८ असे गुण मिळवीत टीम इंडियाने दक्षिण कोरियाची पळता भुई केली.