सोलापूर : साहाय्य व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राचे उदघाटन उद्योगपती दत्ता सुरवसे यांच्या हस्ते झाले. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, प्रिसीजन उद्योग समूहाचे प्रमुख यतीन शहा, प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या सर्वेसर्वा सुभदा देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेची माहिती दिली जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अति मद्यपान निरोगी शरीरासाठी घातक आहे. शिवाय हा मनोशारीरीक आजार देखील आहे. टीव्ही, मोबाइलच्या अती आणि अयोग्य वापरामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न साहाय्य व्यसनमुक्ती केंद्रात केला जात असल्याचे संस्थेच्या सचिव गौरी जोशी यांनी सांगितले, यावेळी उद्योजक दत्ता सुरवसे यांच्यासह सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा यांनीही देशपांडे तसंच जोशी यांच्या सामाजिक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
या व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. शिवाय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अनेकजण व्यसनमुक्त झाले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांनी दिली. प्रसंगी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, डॉ. अनिकेत देशपांडे, डॉ. प्रमोद कुलकणी, ऋचा आणि डॉ. वरुण देशपांडे, डॉ. अजित गांधी असावरी सराफ, रोटरी क्लबच्या जान्हवी माखीजा, डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहुन संस्थेच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता संस्थेचे प्रमुख अनिरुध्द देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिरुध्द आणि शुभदा देशपांड यांनी केले.
या व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. शिवाय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अनेकजण व्यसनमुक्त झाले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांनी दिली.