सोलापूर : महिलांनी चूल आणि मुल या पुरते मर्यादित न राहता घरातून बाहेर पडले पाहिजे, कला कौशल्य सादर केले पाहिजे. या हेतूने सहस्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिर मध्ये दि . ७ जानेवारी २०२५ या दिवशी बाल जत्रा व आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. शाळेच्या रम्य वातावरणात आयोजित या बाल जत्रेचे उद्घाटन केशर भूमकर व सारिका बिद्री यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व सहभागी माता पालकांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या .या बाल ७४ स्टॉलधारकांनी सहभाग नोंदविला होता .पालकांनी आपल्या पाल्यासह या बाल जत्रेत पाणीपुरी,कचोरी,भेळ, ढोकळा,पावभाजी,कच्छी दाबेली,बटाटावडे,गाजर हलवा,शाही टुकडा अशा विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला .तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदानावर घसरगुंडी ,जम्पिंग जपाक , कार गाड्या , बैलगाडी इ .खेळणी ठेवण्यात आलेली होती त्या खेळण्याबरोबर खेळण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला .
हा अतिशय स्तुत्य व चांगला उपक्रम आहे .आज येथे मिनी गड्डा यात्राच आम्हाला अनुभवायला मिळाली .अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व पालकांनी व्यक्त केली .या वेळेस महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा मगजी , युवती प्रतिष्ठानच्याअध्यक्षा गीता हबीब, विद्या गोयल, क्षत्रिय समाज ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री , शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भूमकर, क्षत्रिय समाज ट्रस्टचे सचिव जयकुमारसा कोल्हापूरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल , सदस्य संजीव रंगरेज , तुकारामसा पवार ,शिरीष कोल्हापुरे, गणेश दामजी आदी मान्यवर उपस्थित होते .
तसेच या बाल जत्रेतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे परीक्षण उज्वला पाटील , नीलिमा भांगे , गीतांजली कटारे यांनी केले. ७४ स्टॉलधारकांमधून दहा क्रमांक काढण्यात आले .हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .