सोलापूर :- वैकुंठ एकादशीनिमित्त शुक्रवार, दि.10 जानेवारी रोजी दाजी पेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानात भगवान श्री व्यंकटेश्वरस्वामींचे उत्तरद्वारमधून दर्शनदेण्यात येणार आहे.
वैकुंठ एकादशी रोजी उत्तरद्वार मधून दर्शन घेतल्यास मनुष्याला मोक्ष मिळते अशी श्रद्धा आहे. या संदर्भात अनेक पौराणिक आख्यायिकादेखील आहेत. म्हणूनच या दिवशी दर्शन घेण्यासाठी तिरुमला येथे लाखो भक्तांची गर्दी असते. पण ज्यांना तिरूमलाला जाणे शक्य नाही अशा भाविकांसाठी सोलापुरातील दाजी पेठेतील श्री वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. व या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यत भव्य रक्तदान शिबीर ओयोजित करण्यात आली आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या विश्वस्तांनी केले आहे.