बाबुराव पाटील विदयालय गोटेवाडी ता मोहोळ येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत दोन वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे लोकार्पण बालाजी अमाई न्सचे तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी बालाजी अमाईन्सच्या व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी व संचालक मंडळाचे शाळेकरीता दोन वर्ग खोल्यांची सुंदर इमारत बांधुन या शाळेची अडचण सोडवण्यास मदत केल्याबददल आभार मानले. शाळेस दोन वर्गाची गरज होती वर्गाची कमतरता असल्याने शाळा दोन (सकाळी व दुपारी) सत्रात भरत होती आता बालाजी अमाईन्सच्या मदती मुळे शाळा एकाच वेळेत भरेल असे आभारप्रदर्शन करताना सांगितले.
बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार श्री मल्लिनाथ बिराजदार यांनी बालाजी अमाईन्सच्या सी एस आर विभागाच्या वतीने जिल्हयात विविध उपक्रम राबविले जातात त्याची माहीती शाळेतील विदयर्थांना व पालकांना दिली.
शाळेतील वर्गखोल्याच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास गोटेवाडी चे तानाजी हांडे, शाळेतील शिक्षक नाईकनवरे सरे, सोलनकर सर, अदलिंगे सर, वाघमारे सर, सोनटक्के सर, बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, बसवराज अंटद नचिकेत शहा, गोटेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य व गावातील नागरीक तसेच सर्व विदयार्थी पालक उपस्थित होते .