सोलापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रहार शिक्षक संघटना यांच्यावतीने जिल्हास्तरीय ज्योतिबा-सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार संघटनेचे पुरस्कार सोहळा शनिवार दि. ४ जानेवारी २०२५ रोजी शिवस्मारक सभागृह शिंदे चौक, या ठिकाणी संपन्न झाला सोलापूर जिल्ह्यातील 32 शिक्षक बंधु-भगिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आले असून सदर कार्यक्रमास सचिन जगताप (माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर), कादर शेख (प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. तरी या पुरस्कार सोहळ्यास शिक्षक-शिक्षकेत्तर मुख्याध्यापक उपस्थित होते. सचिन नागटीळक, प्रताप दराडे, उमेश कल्याणी, राजेश काडादी, हणुमंत चव्हाण, बाबासाहेब कापसे, अतुल पाडे, मारूती धोंडगे व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.