सोलापूर – पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रिया व पाण्याच्या विविध तपासण्या बाबत पुरेसे ज्ञान सर्वांना होणे साठी पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण माहिती पुस्तिका तयार करणेत आली आहे. माहिती पुस्तिका कर्मचारी यांना मार्गदर्शक ठरणार आहे. जिल्ह्यात शुध्द पाणी व स्वच्छ अंगण साठी सतर्क रहा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर येथे जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन शेगर, गटविकास अधिकारी योगेश कदम, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, गटविकास अधिकारी बीसी पाटील , वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख, उप अभियंता सुनील कटकधोंड, सांगोला चे उप अभियंता केदार, पंढरपूर चे उप अभियंता एन एस करवते, उत्तर सोलापूर चे उप अभियंता वाय एस बॅबेळगी, उप अभियंता व्ही जी राठोड, उप अभियंता पी ए काटकर, माढाचे उप अभियंता ए एस वाघमारे , मोहोळचे उप अभियंता डब्लू एम शेख , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते. पाणी गुणवत्ता मध्ये जिल्ह्यात उत्कृष्ठ काम केले बद्दल सांगोला गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व उप अभियंता केदार , विस्तार अधिकारी सावंत व टीमचा सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्राफी देऊन गौरव करणेत आला. पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सिईओ जंगम यांच्या हस्ते करणेत आले. प्रारंभी सिईओ जंगम यांचे हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले.
सिईओ दिलीप जंगम पुढे म्हणाले, पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शुध्द पाणी व स्वच्छ परिसरा साठी सजग असले पाहिजे. पाण्याची नियमित तपासणी व्हायला हवी. लोकांना समजावून सांगा. सांडपाण्या साठी शौषखड्डे घ्या. शुध्द पाण्या बरोबर परिसर स्वच्छता महत्वाची आहे. जलशुद्धीकरण करण्यासाठी जलसुरक्षकाची नेमणूक केलेली आहे म्हणजे अतिशय महत्त्वाची जबाबदारी ही जलसुरक्षकाला दिलेली आहे. या जबाबदारी पार पाडत असताना ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत कार्यरत असलेल्या गावातील पाच महिला यांना पाणी शुद्धीकरणाबाबतचे संपूर्ण ज्ञान असणे अपेक्षित आहे. ग्रामस्थांना पाणी पुरवठा अशुद्ध झाला तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे जलशुद्धीकरण करणे महत्वाचे आहे.
पाण्याचे नियमित शुद्धीकरण, टी. सी. एल. हाताळणी, ठेवण्याची पद्धत ओ.टी. चाचणी, पाण्याच्या विविध तपासण्या (भौतिक, रासायनिक आणि जैविक), पाणी नमुने घेण्याची पद्धत, हातपंप आणि विहीर यांचे पाणी शुद्धीकरण याबाबत परिपूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न या पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून केला आहे.
प्रास्ताविक प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण विषयक काम करणाऱ्या सर्व सहभागी घटकांना ज्ञान मिळावे, हे ध्येय ठेवूनच जिल्हा परिषदेच्या वतीने पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण पुस्तिका संपूर्ण परिपूर्ण माहितीसह देताना सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. पाणी शुद्धीकरण करण्याच्या पवित्र कामाचा वसा घ्यावा. असेही जाधव यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी प्रेझेंटेशनद्वारे इलेक्ट्रोक्लोरिनेटर ची परिपूर्ण माहिती दिली. पिण्याचे पाण्याचे नियमित शुध्दीकरण व निरजंतुकीकरण करणे साठी हे उपकरण वापरणेत येणार आहे. योजनांची देखभाल दुरुस्ती करणेसाठी नियोजन करणेसाठी नियोजन करणेची आवश्यकता असल्याचे कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी ठामपणे सांगितले. मुश्ताक शेख यांनी जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळा व खाजगी स्त्रोतांचे पाणी तपासणी माफक दरात करून घेणेबाबत आवाहन केले.
या प्रसंगी वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख, प्रायमुव्ह चे ए सी मुजावर, जिल्हा रसायनी विठ्ठल कोरे, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, यात्रिकी. विभागाचे उप अभियंता एम व्ही व्हटकर , पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. बोधले यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचे मार्गदर्शना खाली लेखाधिकारी श्रींकात मिरगाळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हट्टे, सह्यायक लेखा अर्चना कणकी, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे, सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिॅदे, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार प्रतिक्षा गोडसे , आनंद मोची , योगेश कुंभार, डाटा एन्ट्री आॅपरेटर अल्फिया बिराजदार यांनी प्रयत्न केले. सुत्रसचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांचे हस्ते उप अभियंता सुनील कटकधोंड , पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. बोधले अभियंता सायली चव्हाण , सोनाली कुलकर्णी , प्रशांत शिंदे, आम्रपाली गजघाटे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करणेत आला.