सहस्त्रार्जुन प्रशालेत डिसेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात त्यामध्ये अंतर्वर्गीय सामने खेळले जातात यामध्ये कबड्डी खो-खो लीगोरी संगीत खुर्चीत लिंबू चमचा गोळा फेक स्लो सायकल शंभर मीटर धावणे बुद्धिबळ क्रिकेट असे सर्व प्रकारचे खेळ घेतले जातात प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थी या खेळांमध्ये हिर हिरीने भाग घेतो
या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय खेळाडू इंटरनेशनल डाइवर कुमारी श्रावणी प्रताप सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले त्या नुकत्याच फिलिपिन येथे झालेल्या ड्रायव्हिंग स्पर्धेमध्ये भारताकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करून गोल्ड मेडल मिळवले आहे . त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी त्यांचा प्रवास कसा सुरुवात झाला त्यांचे कोच श्रीकांत शेटे सरांनी त्यांना कशाप्रकारे तयार केलं याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. व पुढचा ध्येय ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळण्याचा आहे हे सुद्धा त्यांनी नमूद केलं.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्रावणीला विविध प्रश्न विचारले व श्रावणीने त्यांना समाधानकारक असे उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राजेश गोविंदराव कळमनकर (सचिव क्रीडाभारती सोलापूर ) हे होते त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये तुमची शाळा हॉकीचे एक शक्तिपीठ आहे असे उल्लेख करून हॉकी खेळाडूंचे कौतुक केले शाळेने हॉकी खेळात मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे कौतुक केले. त्याचबरोबर बदलत्या जीवनशैलीत खेळ किती महत्त्वाचे आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
राजूसा बाबुरावसा भूमकर ( अध्यक्ष-सहस्त्रार्जून शैक्षणिक संस्था) यांनी खेळामुळे शरीराचा सर्वांगी विकास होतो व प्रत्येकाने एखादा खेळ छंद म्हणून जोपासावा याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे शेवट अध्यक्षीय समारोपाने झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री संजीव महादेवसा बिद्री (अध्यक्ष सो.स. क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट सोलापूर) यांनी आपल्या मनोगतातून खेळामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आणि त्यामुळे होणारे शरीराची हालचाल यांचा सकारात्मक फायदा आपल्या मानवी शरीराला होतो प्रत्येकाने रोज एक तास तरी खेळले पाहिजे आणि स्वतःला मोबाईल पासून दूर लांब ठेवले पाहिजे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव माननीय श्री जयकुमार भागवतसा कोल्हापुरे व संस्थेचे सदस्य माननीय श्री भरतकुमार शालगर सर व सहस्त्र अजून शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा कृष्णाचा गोयल साहेब हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भगवंत उमदीकर यांनी केले क्रीडा शपथ इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी शिवांजली रुपेश होदडे हिने केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद मॅडम इंग्लिश मीडियमचे विभागाचे मुख्याध्यापक डॉ. विष्णू रंगरेज हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा काळे मॅडम यांनी केले तर आभार प्रशालेचे क्रीडा शिक्षक डॉ. उज्वल मलजी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी खूप मेहनत घेतली.