सोलापूर : येथील अग्रगण्य सिमेंट कंपनी झुअरी सिमेंट यांच्यावतीने वैश्विक महामारी करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी व जबाबदारी ओळखून या कंपनीकडून होटगी स्टेशन ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले. सदर कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य कंपनीचे डीलर यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात आले. साधारण दोनशे किट देण्यात आले. यावेळी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर पासकंटी ,तरटे व कट्टे यांच्या शुभहस्ते सदर किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास गावकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश एंटरप्राइज प्राईसचे डीलर झिंगाडे व विरुपाक्ष ट्रेडर्सचे हुनजे यांनी मेहनत घेतली.