जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने विविध परिणाम केले आहेत. त्याचाच मोठा परिणाम चित्रकारांवर होणार आहे. ए आय मुळे चित्रकारितेवर घाव घातला जाईल असे स्पष्ट दिसत आहे. अशी व्यथा चित्रकारांनी बोलून दाखवली आहे. चित्रकारांची कलाकृती व त्याच्या विक्रीवरही विविध परिणाम दिसून येणार आहेत. भविष्यामध्ये येणाऱ्या या संकटाला कसे सामोरे जावे अशी चर्चा कलाकारांमध्ये होत आहे.
अनेक छोटे-मोठे चित्रकार हे आपल्या कलेच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवतात. काहीजण त्याचे प्रदर्शन भरून आपल्या कलेच सादरीकरण करतात. परंतु सध्या नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI यामुळे चित्रकार देखील अडचणीत आले आहे.