श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज १११व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्ताने आयोजन
श्रीराम जय राम जय जय राम नामाच्या गजराने वातावरण रायमय
करकंब:-प्रतिवर्षाप्रमाणे जप संकुल क्र १ यांचे वतीने श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंबमध्ये मोठ्या उत्साहात दिनांक १९ डिसेंबर पासून सुरू असून सोमवारी त्यानिमित्ताने ख्यातनाम युवा गायक करण देवगांवकर यांच्या अभंगवाणी चा कार्यक्रम श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ येथे आयोजित करण्यात आला होता.
सुरुवातीला जपकार श्री धनंजय इदाते.महादेव दुधाणे.प्रभाकर टेके.मिलिंद ऊकरंडे.सिध्देश्वर बुगड.मोहन बोधे.राणी सिदवाडकर.दत्तात्रय खंदारे.ज्ञानेश्वर दुधाणे आणि कलाकार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला करकंबकरांना अभिजात शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी त्यासाठी एक छोटीशी बंदिश राग केदार मध्ये कान्हा रे बंदिश गाऊन अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली आणि अजरामर अभंगरचना भक्ती गीते त्यामध्ये चुनरीया झिनी रे झिनी.जग मे सुंदर है दो नाम. जो काला इक बासुरीवाला.राम का गुणगान किजीए.अबीर गुलाल उधळीत रंग. अवघे गरजे पंढरपुर.बाजे रे मुरलीच्या बाजे.अमृताची फळे.ध्यान करु जाता.अशी अनेक सुंदर अभंग आणि भक्ती गीते गाऊन करकंबकरांना अतिशय सुंदर अशा स्वरांची मेजवानी दिली त्यांना तितकीच अप्रतिम आणि दमदार साथ संगत तबला गीत इनामदार पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम वैभव केंगार टाळ माऊली पिसे तानपुरा कोमल सिदवाडकर.यांनी अतिशय सुंदर देत करकंबकर कलारसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत रंगत वाढवली.यावेळी करकंब आणि करकंब परिसरातील अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या अभंगवाणीच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
करकंब सारख्या ग्रामीण भागात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न असून घराघरात पोहचला पाहिजे.आणि कलाकार तयार झाले पाहिजेत असं ज्ञानेश्वर दुधाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जप संकुल मधील सर्व जपकार आणि नामप्रेमी त्यामध्ये मोहन बोधे.विशाल बोधे.वृषाली बोधे. सचिन मुजमुले.नवनाथ कांबळे.आदींनी विशेष परिश्रम घेतले.