कोकण मराठी परिषद गोवा यांच्याकडून सुवर्णधन सन्मानित
गोव्याच्या शेकोटी संमेलनात डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण सन्मानित
पणजी : दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी, अभिजात मराठीची स्थिती कधी या महत्त्वाच्या विषयावर आधारित सुवर्णधन दिवाळी विशेषांक २०२४ च्या वैशिष्ट्यपूर्ण व उत्कृष्ट संपादनाबद्दल कोकण मराठी परिषद गोवा यांच्यातर्फे ,” उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ” २० व्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात संमेलनातील या महत्त्वाच्या पुरस्काराने संमेलनाच्या उद्घाटन सत्रात संपादिका प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड – चव्हाण यांना सन्मानित केले गेले. याप्रसंगी कोकण मराठी परिषद संस्थेचे अध्यक्ष सुदेशजी अर्लेकर, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तुकाराम रोंगटे, उद्घाटना डॉ.स्नेहा महाम्बरे ,स्वागताध्यक्ष अभिनेत्री सौ अमिता नायक- सलत्री, नगरसेवक व बोडगेश्वर संस्थांचे अध्यक्ष आनंद भाईडकर नगराध्यक्ष डॉ.नूतन बीयोलकर, माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर ,अँड तारक आरोलकर, कार्याध्यक्ष म्हाळू गावस , रोहिदास गावकर, गुरुदास वायगणकर तसेच कार्यवाहक सौ मेधा जाधव व प्रमुख कार्यवाहक व्यंकटेश नाईक होते.
२० व्या शेकोटी साहित्य संमेलनाचे निमंत्रित कवींच्या सत्राच्या अगोदरच्या सत्रात उपस्थितांशी संवाद साधत ,’ अभिजात मराठीची स्थिती गती ‘ या विषयावर प्रो. डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थितांना हे मार्गदर्शन खूप बोधप्रद ठरले.निमंत्रित करण्यात आलेल्या कवींबरोबरच डॉ. सुवर्णा गुंड – चव्हाण यांनी,’ बाईपण ‘ ही कविताही सादर केली.