- पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिन साजरा…
सोलापूर : ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने विणकर बाग येथील विणकर पुतळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते सुताचा हार आणि पुष्पहार घालून राष्ट्रीय विणकर दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी हातमाग कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी हातमागावरील तयार होणाऱ्या वस्त्रे वर्षातून किमान पाच ते सहा वेळा खरेदी करून परिधान करावे, असे आवाहन केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापूरे, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल, गौरीशंकर कोंडा, नितीन मार्गम, प्रशांत कुडक्याल, रमेश यन्नम, सुधाकर नराल, अमर येरपूल, किरण वल्लाल, चंद्रशेखर गडगी, आनंद गोसकी आदी उपस्थित होते.