पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाचे कुलगुरू श्री प्रकाश अण्णा महानवर यांनी विदयापीठातील कर्मचारी, विदयार्थी, शिक्षक व पालक असे ६०० ते ८०० लोक दररोज विदयापीठास कामनिमित्त दुचाकी वाहानातून किंवा प्रवासी रिक्षा या सारख्या वाहानातून (सोलापूर पुणे) राष्ट्रिय महामार्ग या वरून जिव धोक्यात घालून येतात. या सर्वांना दररोज विदयापीठास येण्यास त्रास होऊ नये या करीता बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे कडे ४१ सीटर बसची मागणी केली. व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्यावतीने ४१ सीटर आयशर स्काय लाईन स्टाफ बस २०९० ही बस विदयापीठास विदयार्थाकरीता देण्यास भाली या बसचा चावीप्रदान कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात आज दि १०.१२.२०२४ रोजी सकाळी संपन्न झाला. या प्रसंगी बालाजी अमाईन्सचे जनरल मॅनेजर गोविंद मेनचके यांच्या हस्ते विदयापीठाचे कुलगुरू प्रकाश अण्णा महानवर यांचे कडे बसची चावी प्रदान करण्यात आली तसेच कुलगुरू यांचे हस्ते बसची पुजा करून श्रीफळ वाढऊन करण्यात आली. या कार्यक्रमात बालाजी अमाई न्सचे सीएसआर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदार जनरल मॅनेजर रविन्द्र जिल्ला, डी. जी. एम विनय दुर्गम यांचा सत्कार कुलगुरू प्रकाश अण्णा महानवर यांचे हस्ते करण्यात आला. आर. एन. डी. टिम चे डॉ लक्ष्मण अडसूळ, डॉ. महेश हुबळीकर या कार्य कमास उपस्थित होते.
या वेळी श्री मल्लिनाथ बिराजदार यांनी बालाजी अमाईन्सच्या सीएसमार अंर्तगत सोलापूर व धाराशिव जिल्हयात झालेल्या विविध उपक्रमाची माहीती दिली. विदयापीठाचे कुलगुरु श्री प्रकाश अण्णा महानवर यांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे बस भेट दिल्याबददल आभार मानले. बस मुळे दररोज सोलापूरातून विदयापीठास येणा-या नादुचाकी वर येण्याचा त्रास होणार नाही तसेच आणखी नविन बस ची मागणी इतर संस्थाना करणार असल्याचे सांगितले.
विद्यापाठाचे कुलसचीव योगिनी घारे मॅडम यांनी आभार मानले.
या कार्यकमास प्रा. लक्ष्मीकांत दामा मा प्र कुलगुरू, कुलसचीव योगिनी घारे मॅडम, बालाजी अमाईन्सचे सीएसआर विभागप्रमुख श्री मल्लिनाथ बिराजदार जनरल मॅनेजर रविन्द जिल्ला, डी. जी. एम प्रभाकर दुर्गम, जनरल मॅनेजर श्री गोविंद मेनचके, पणन ताटी दत्तप्रसाद सांजेकर आर. एन. डी. टिम चे डॉ लक्ष्मण अडसूळ, डॉ. महेश हुबळीकर तसेच विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख, सर्व विभागातील शिक्षक, सती विभागातील विदयार्थी तसेच विदयापीठातील स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.