सोलापूर : शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वतीने व भिम कन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्या प्रणोती शशिकांत जाधव यांच्या माध्यमातून बेघरनिवारा केंद्र याठिकाणी जाऊन लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची १०० वी जयंती उत्सव साजरा करण्यात आला… सर्वप्रथम लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजा करण्यात आली तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बेघर निवारा केंद्रातील अनाथ लोकांना मोतीचूर लाडू चे वाटप करण्यात आले…
यावेळी हॅप्पी युथ क्लबचे संस्थापक सोहनजी लोंढे, दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष बंडू गवळी, मातंग समाज संघ सोलापूर व दलित पँथर शहराध्यक्ष विशाल लोंढे जगदंब-जिजाऊ प्रतिष्ठान च्या संस्थापिका प्रियांकाताई डोंगरे भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थे चे मार्गदर्शक शशिकांत जाधव नंदकुमार जाधव विजय देवकुळे अजय गायकवाड व सविता कसबे अनुराधा जाधव शिल्पा जाधव नजमुन्निसा मुल्ला निता ओहोळ कवीता देडे आदि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते
तसेच सो.म.पा बेघर निवारा केंद्राच्या वैशाली आव्हाड, प्रदिप नागटिळक प्रशांत क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले त्यांचे व प्रमुख मान्यवरांचे संस्थे च्या संस्थापिका प्रणोती शशिकांत जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले…