मुंबई-आज राज्याचे नुतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले .
सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने ज्यांनी राज्यात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम केला असे राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नुतन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि किसन जाधव यांनी आवर्जुन आनलेल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा व प्रसाद देवून मनपूर्वक अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अजितदादा यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आगामी काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान यासह शहरातील सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित काम करा मी आपल्या पाठीशी आहे हवी ती ताकद देवून सोलापूरच्या विकासाकरीता सहकार्य करणार असल्याचे सांगितल.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे जेष्ठ नेते दादा चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे व्ही जे एन टी अध्यक्ष रूपेश भोसले युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेशअण्णा गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे हुलगेप्पा शासम शहर संघटक,माणिक कांबळे,लखन जाधव आदी उपस्थित होते .