सोलापूर दिनांक: एका महत्त्वपूर्ण खटल्यात , मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेचे (IPC) कलम 498A अंतर्गत क्रूरता आणि छळ केल्याचा आरोप असलेल्या सासरच्या लोकांविरुद्धच्या खटल्याच्या कार्यवाहीस स्थगिती दिली आहे. या प्रकरणामध्ये सासरकडील नातेवाईकांवर केलेल्या आरोपांचा समावेश आहे.
न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी हा आदेश जारी केला. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, पतीवर प्राथमिक आरोप असताना, कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग अस्पष्ट असल्याचे दिसून आले. केवळ जास्तीत जास्त लोकांना खटल्या मध्ये गुंतवल्याचे सकृतदर्शनी दिसते. गुंतवण्यासाठी केलेले.
याचिकाकर्त्यांमध्ये सासू-सासरे, विवाहित नंदा व त्यांचा पती, आणि एक अल्पवयीन नातेवाईक यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर विशिष्ट असे आरोप नाहीत. पुढील विचारविमर्शाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांवरील खटल्याची कार्यवाही ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत थांबवण्याचे निर्देश दिले, तेव्हा या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.
याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व ऍड. रितेश थोबडे,ऍड अभिजीत इटकर महाराष्ट्र शासनातर्फे ऍड सुकांत कर्माकर यांनी बाजू मांडली.