सोलापूर : कोरोना महामारी काळात पोलिसांनी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत या पोलिस बांधवांना रक्षकांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम प्रथमेश प्रतिष्ठान संचलित प्रथमेश स्पोर्ट्स क्लब व प्रथमेश महिला प्रतिष्ठान ने केलेला आहे.सोमवार 3 ऑगस्ट रोजी सोलापूर येथील एस. आर.पी.एफ पोलीस कॅम्प येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस आर पी एफ पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापुर समादेशक रामचंद्र केंडे सर, सह्यक समादेशक सुभाष सोनवणे , कार्यक्रमाचे सविता केंडे आणि एस आर पी एफ पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापुर चे कर्मचारी उपस्थित होते व तसेच प्रथमेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश शिंदे आणि सचिव ज्योतिर्लिंग शिंदे उपस्थित होते .या कार्यक्रमांमध्ये 100 कर्मचारी आणि 10 अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्क डिस्टन्स आणि मास्क बांधुन सॅनिटायजर करून कार्यक्रम पार पडले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुजा रोकडे ,अर्पिता निकंबे, अश्विनी जाधव ,प्रियांका चव्हाण,विद्या भगरे भोसले, जयश्री हलदी, उमा राजपूत , चिन्मय नान्नजकर, वर्षातोरवी नान्नजकर, गुरुशांताव गौडगोन, यांनी परिश्रम घेतले आहेत.