सोलापूर : हरविलेल्या बालकाबाबत व १८ वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान १३ ही विशेष पोलीस महानिरिक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान १३ ही विशेष शोधमोहिम १ ते ३० डिसेबर २०२४ दरम्यान राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर व पोलीस ठाणे निहाय टिम तयार करुन सोलापूर शहरातील हरविलेल्या बेपत्ता १८ वर्षाखालील बालके व १८ वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान १३ ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरातून प्रत्येक पोलीस स्टेशन कडून ऑपरेशन मुस्कान १३ या मोहिमेसाठी एक अधिकारी व तीन पोलीस अंमलदार व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांची विशेष टिम तयार करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, संशयीत, बेवारस बालकाबाबत आपणास काही माहिती प्राप्त झाल्यास पोलासांशी व चाईल्ड लाईन १०९८ तसेच नियंत्रण कक्ष सोलापूर शहर फोन नंबर ०२१७ २७४४६०० येथे संपर्क साधून माहिती कळवावी आपली ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त राजन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक महादेव राऊत नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर हे ऑपरेशन मुस्कान १३ व्दारे हरविलेल्या सर्व बालकांचा व १८ वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे.