अक्कलकोट : अक्कलकोट,जिगर नागवंशीय वैचारिक व सामाजिक संघटनेच्या वतीने किणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आले. त्यावेळी जिगर नागवंशीय सामाजिक व वैचारिक संघटनेचे प्रवक्ते सागर सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र ताट मानेने उभा आहे .त्यांचं साहित्य हे येथील दबलेल्या, कष्टकरी,कामगार,वंचित, मानव केंद्रित आहे ,त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे व त्यांच मराठी साहित्यात फार मोठं योगदान आहे ज्याप्रकारे महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी संमेलन भरवले जाते त्याप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या काळात भरवलं जावं, त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच साहित्य हे शेवटच्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे म्हणून समता मूलक समाजाची निर्मिती करायची असेल तर त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे ती काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.दलित सोनकांबळे यांनी मांडले तर आभार नागेश सोनकांबळे यांनी मांडले त्यावेळी जिगर नागवंशीय सामाजिक व वैचारिक संघटनेचे अध्यक्ष प्रा.बाबासाहेब सोनकांबळे, प्रा.अरुण सोनकांबळे,पदमशील जैनजंगडे(सर), प्रा.चंदन सोनकांबळे, प्रा.मल्लिकार्जुन सोनकांबळे भिम सोनकांबळे मनोज सोनकांबळे, राज कांबळे, दिनेश सोनकांबळे जनार्दन सोनकांबळे सिद्धार्थ कांबळे,बसवराज सोनकांबळे, अक्षयकुमार आनंद जैनजंगडे, शेखर जैनजंगडे, सोनकांबळे, , नागेश कांबळे विशाल कूटनूरे आदि उपस्थित होते.