मनाली : अभिनेत्री कंगना रणौतच्या मनाली येथील घरावर गोळीबार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कंगनाच्या टीमने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मी माझ्या बेडरुममध्ये झोपलेली असताना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आवाज आला. तो गोळीबाराचाच आवाज होता, मला घाबरवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असा आरोप कंगनाने केला आहे. तसेच कंगनाच्या घराची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.