संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर संविधान वाचन झाले .यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,जय भीम , संविधानाचा विजय असो अश्या घोषणांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर दणाणून सोडला होता.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रतीचे सामुदायिक वाचन करण्यात आले .त्याच अनुषंगाने सोलापुरात शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वात २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. आम्ही संविधानाचा सन्मान करतो त्यामुळे राज्यातील मतदार राजाने महायुतीच्या बाजूने कौल दिला.आणि राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. विरोधकांनी जनतेची दिशाभूल करून चुकीचा प्रचार केला होता.त्यामुळे राज्यातील जनतेने विरोधकांना चांगलीच अद्दल घडविली.हा विजय लोकशाहीचा आहे .आणि राज्यात पुन्हा आपल्या हक्काचे सरकार स्थापन होणार असल्याने या सरकारचे सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे. येणाऱ्या काळात अजित दादा नक्कीच मुख्यमंत्री होतील असे मत व्यक्त करून सोलापूर शहर जिल्हा वासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या….
या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी सर, ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे , आनंद मुस्तारे, महेश निकंबे,अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके, माजी नगरसेवक गणेश पुजारी, पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले, युवक अध्यक्ष सुहास कदम,युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक संघटक दत्ता बडगंची,
अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर भाई शेख, युवक प्रदेश सरचिटणीस खलील भाई शेख , वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, युवक प्रदेश सरचिटणीस साजिद शेख ,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजू बेळ्ळेनवरू सामाजिक न्याय कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद, वाहतूक सेलचे अध्यक्ष इरफान भाई शेख, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, असंघटित कामगार अध्यक्ष मार्तंड शिंगारे संजय सांगळे, शहर सरचिटणीस निलेश कांबळे डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने, विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील ,दक्षिण महिला कार्याध्यक्ष कांचन पवार, घाडगे ताई, प्रज्ञासागर गायकवाड श्याम गांगर्डे, युवराज माने,मुहिज मुल्ला ,प्रदीप बाळशंकर , मौला भाई शेख, दत्ता बनसोडे, माणिक कांबळे, वसंत कांबळे, चाचा सोनवणे, भास्कर अडकी, यांच्यासह पक्षाचे पक्षाचे सर्वच प्रमुख नेते , पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…..