सोलापूर : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही तत्पर आहोत असा संदेश देत दि.३१ जुलै रोजी शुक्रवारी पोलिसांनी शहरातील विविध चौकातुन रूट मार्च काढण्यात आला.सोलापूर शहर हद्दीत बकरी ईद व केरोना विषाणूू प्रदुर्भावच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय व पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,पोलीस उपायुक्त बापू बांगर,पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये विभागाअंतर्गत हा रूट मार्च शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान काढण्यात आला.या रूट मार्च मध्ये नागरिकांना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मास्कचा वापर करून सोशल डिस्टिकचा अवलंब करण्यात आला.या रूट मार्च मध्ये पोलीस उपायुक्त (गुन्हेे) बापू बांगर,सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे,सहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे,शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दरेकर,यांच्यासह ३३ अधिकारी व १८४ कर्मचारी सहभागी झाले होते.तसेच पोलीस स्टेशन कडील मोबाईल,पी.सी.आर मोबाईल बीट मार्शल,सीसीटीव्ही वाहन,वज्र वाहन,महारक्षक वाहन व दंगा नियंत्रण वाहनांचा सहभाग होता.