संपूर्ण विढी घरकुल पवनमय
देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे. त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी माझी जनसेना पक्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या सर्व तेलगू भाषिक बंधू आणि भगिनींनी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून द्यावे. सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे आणि सुभाष देशमुख यांना निवडून द्यावे. असे पवन कल्याण म्हणाले…..
सोलापूरकरांनी मला जो प्रेम दिला त्यासाठी मी फार आनंदी झालो असून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास मी लवकरच पुन्हा सर्व तेलगू भाषिकांसोबत संवाद साधायला एका मोठ्या जाहीर सभेमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे. मी यापूर्वीच सोलापूरला यायला हवे होते. तेलुगु भाषिक बांधवांनो आपल्याला देशामध्ये एकाच विचाराचे सरकार आणायचे आहे. आंध्र प्रदेशामध्ये आम्ही आणि तेलगू देशम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करून देशाच्या विकासासाठी आम्ही भाजपला सहकार्य करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील हजार वर्षापासून प्रलंबित असलेल्या आपल्या प्रभू श्रीरामांचे मंदिर झाले. प्रभू श्रीराम आपले आराध्य दैवत आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर काय करू शकतो हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी भाजपच्याच उमेदवारांच्या मागे आपली तेलगू शक्ती एकत्र होऊन साथ देऊया असेही पवन कल्याण यांनी यावेळी म्हणाले.
पावर स्टार आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रोड शोसाठी जमलेल्या गर्दीची धास्ती घेऊन महेश कोठे यांच्या बगलबच्चांनी एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जुना विडी घरकुल भागातील लाईट बंद करण्यास भाग पाडले अशी चर्चा या भागातील नागरिकांनी केली. पवन कल्याण यांना पाहता येऊ नये, त्यांच्याशी कोणी संवाद साधू नये यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे चर्चा विडी घरकुल परिसरात मोठ्या खमंगपणे सुरू होते. मात्र आम्ही तेलगू भाषिक हे पारंपारिक भारतीय जनता पक्षाचेच मतदार आहोत. धर्माभिमानी पावर स्टार पवन कल्याण यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण तेलुगु शक्ती आम्ही भारतीय जनता पक्ष विजय कुमार देशमुख मालक यांना मतदानरुपी पाठबळ देणार असल्याचे दत्तात्रय बडगु यांनी सांगितले……