सोलापूर : प्रभाग 26 मधील गोकुळ नगर येथील बालाजी मंगल कार्यालय येथे सोलापूर महानगरपालिका तर्फे प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्यावतीने फिवर ओपीडी आणि रॅपिड अँटीजन टेस्टचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरास महापौर श्रीकांचना यन्नम, लोकमंगल समूहाचे मनीष देशमुख, नगरसेविका राजश्री चव्हाण, डॉ. वळसंगकर, डॉ. श्रुती कुंभार, डॉ.केतकी रामदास, डॉक्टर प्रिया वनवे, ANM आरती शिरसागर, ज्योती पाटील, संगीता गौडगाव, शिक्षक विठ्ठल वाघमोडे. भाजपा दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष महेश देवकर, आरोग्य निरीक्षक वाघमारे, झोनचे JE बिराजदार साहेब, भाजपा महिला सरचिटणीस सौ गीता पाटोळे, गोकुळ नगर मधील प्रदीप तडकल यांची उपस्थिती होती. यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी स्वतःहून रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेतल्या.