लोटली हजारोंची गर्दी : मुरलीधर मोहोळ म्हणाले, ही तर जणू विजयी यात्राच
सोलापूर : ढोल ताशांचा कडकडाट आणि फटक्यांची आतिषबाजी अशा उत्साही वातावरणात हजारोंच्या गर्दीने ‘देवेंद्र कोठे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ ची घोषणा दिली.
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ शनिवारी रामवाडी परिसरातून प्रचंड मोठी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस अक्षरशः हजारोंची गर्दी लोटली होती.
मधुकर उपलप वस्ती परिसरातून पदयात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी नागरिकांकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून, फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. ही पदयात्रा नसून जणू विजयी यात्राच आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नोंदवली.
या पदयात्रेत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, इच्छा भगवंताची प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मण जाधव, माजी महापौर विठ्ठल करबसु जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, नागनाथ कासलोलकर, मोनिका कोठे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजयुमो भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष अमोल गायकवाड, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, भाजप जेष्ठ नेते चंद्रकांत जाधव, कैकाडी समाज युवक अध्य्क्ष दीपक जाधव, टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव, पामलोर समाज जेष्ठ पंच अंबादास जाधव, शिवराज गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती सिद्राम अट्टेलुर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदयात्रेच्या मार्गावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी चौकाचौकात स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घालून पुष्पवृष्टी करीत, फटाक्यांची आतिषबाजी करीत मतदार स्वागतासाठी उभे होते. अनेक ठिकाणी महिला भगिनींनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उमेदवार देवेंद्र कोठे यांचे औक्षण केले. भारतमाता की जय, वंदे मातरम, देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा याप्रसंगी देण्यात येत होत्या.
या पदयात्रेत माजी नगरसेविका सरस्वती कसोलकर, नागनाथ कासोलकर, शिरीष गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, दीपक गायकवाड, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी शोभा गायकवाड, रुक्मिणी जाधव, संगीता बिराजदार, प्रमिला स्वामी, लक्ष्मी पवार, संगीता गायकवाड, सरोजिनी जाधव, सुरेखा गायकवाड, अभिजित कदम, अमोल जगताप, गजू शिंदे, उमेश जाधव, दयानंद जाधव, संतोष गायकवाड, अंकुश गायकवाड, माऊली जरग, माणिक कांबळे, ऋषीं येवले, हुलगप्पा शासम, वृषभ प्याटी यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचंड गर्दी आणि स्वागताने केंद्रीय राज्यमंत्री गेले भारावून
भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभागी नागरिकांची प्रचंड गर्दी आणि नागरिकांकडून ठिकठिकाणी झालेल्या प्रचंड मोठ्या स्वागताने केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भारावून गेले.