सोलापूर : प्रभाग क्रमांक सात येथील चौपाड,नामदेव चिवडा,शिंदे चौक इत्यादी परिसरात अनेक वर्षांपासून ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी व स्थानिक रहिवाशांना त्रासाला सामोरे जावं लागायचं.पिण्याचे पाणी आलेला दिवशी व पावसाळ्यात सततच्या इथे ड्रेनेज लाईन ओव्हरफुल होऊन पाणी व्हायचं उतार भागामुळे भागवत टॉकीज पर्यंत प्रवाह असायचा त्यामुळे या सर्व भागातील लोकांना त्रास व्हायचा सदर ठिकाणी जुनी ९इंची ड्रेनेज लाईन असल्यामुळे नव्याने या ठिकाणी अमृत योजनेतून १४ इंची मंजूर करण्यात आली होती.त्याचा प्रत्यक्ष कामाला सुरुवात मागील वर्षी करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक अडचणी तसेच प्रशासकीय मान्यता मध्ये त्रुटी आल्यामुळे काम रखडलं होतं.
मागील दोन तीन महिन्यापासून सतत पाणी वाहत असल्यामुळे इथल्या नागरिकांनी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्याकडे मागील आठवड्यात काम मार्गी लावण्यासाठी कळविले होते.रविवारी चौपाड विठ्ठल मंदिर येथे नगरसेवक देवेंद्र कोठे, महापालिकेचे सार्वजनिक अभियंता श्री.संजय धनशेट्टी साहेब दास कन्स्ट्रक्शनचे श्री.बडवे, झोन अधिकारी मोहन कांबळे ,प्रभागाचे अधिकारी श्री अमोल होमकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, रमेश काका खरात, किरण पवार,बाबा शेख, खलील शेख,यशवंत कोळेकर आदींनी या ठिकाणी मतदाराला असलेल्या अडचणी विषयी पाहणी व चर्चा केली.श्री संजय धनशेट्टी यांनी तांत्रिक दृष्ट्या व प्रशासकीय मान्यता मध्ये आलेली अडचण तातडीने सोडवून दिले तसेच सदरचा काम सोमवार पासूनच सुरू करावे असे संबंधित मतदारांना कालच आदेश दिले होते.आज सोमवारी या कामाला भागवत चाळ येथून सुरुवात झालेली आहे.
सदर काम नां ते दत्त चौक पर्यंत होणार असून अखंडित ते काम सुरू ठेवावे या साठी सूचना संबंधितांना देण्यात आल्या.या कामामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी मक्तेदार व महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान प्रभागचे नगरसेवकांनी केला आहे प्रभाग सात नगरसेवक देवेंद्र कोठे अमोल शिंदे सारिका पिसे मंदाकिनी पवार