नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन “निमा” सोलापूर यांच्याकडून तामलवाडी येथील सुयोग फाऊंडेशन संचलित ‘बालसंस्कार केंद्रातील चिमुकल्यांसोबत केक कापून ” बालदिन” मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी संस्कार केंद्रातील मुलांना खाऊसोबत थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅंकेट टोपी व शालेय साहित्य आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले.
निमा वुमन्स फोरम सोलापूरचे पदाधिकारी डॉ. शितल कुलकर्णी ,डॉ. पल्लवी भांगे , डॉ. अश्विनी देगांवकर ,डॉ.ललिता पेठकर यांच्या संकल्पनेतून हा बालदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. यास निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी पदाधिकारी डॉ.अभिजीत पुजारी, डॉ. प्रवीण ननवरे, डॉ. सुधीर कुंभार यांनी आयोजनकामी सहकार्य केले. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांसाठी तमालवाडी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर रविराज गायकवाड यांच्या ,”सुयोग फाउंडेशन”च्या माध्यमातून बालसंस्कार केंद्र चालवले जाते. यात विविध स्तरातील बालकांचा समावेश आहे. बाल संस्कार केंद्रातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना पुन्हा बालपणीचे दिवस अनुभवायला मिळाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमा चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, साई आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव गायकवाड, निमा वुमन्स फोरम महाराष्ट्र राज्याद्यक्ष्या डॉ.अनुश्री मुंडेवाडी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व उपस्थिताना मार्गदर्शन केले.
मुलांसाठी भेटवस्तू ,केक, बलून डेकोरेशन इत्यादी करता.सायली चंद्रकांत पुलकुंडवार ,डॉ अश्विनी प्रसाद देगांवकर , रामचंद्र मार्तंड कुलकर्णी, डॉ शितल कुलकर्णी,
डा. पल्लवी भांगे यांनी योगदान दिले.