सोलापूर : सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील बी ब्लॉक येथील नव्याने तयार करण्यात आलेले कोविड-१९ चे रुग्णांसाठी चे १२० बेड चे सर्व सोयीयुक्त उपचारासाठी असलेल्या विभागाचे उद्घाटन आज पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते शहर मध्यच्या आमदार प्रणिती ताई शिंदे तसेच मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याकरिता शासकीय महाविद्यालयात उपचाराची गरज ओळखून जास्तीचे बेड उपलब्ध करून देण्यात आले असून लवकरच अधिकचे २० ICU बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.