अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मतदारसंघातील कडबगांवमध्ये निवडणुकीच्या प्रचारार्थ बैठक घेतली. यावेळी त्यांनी गावासाठी केलेली विकास कामे गावकऱ्यांना सांगून आपले मतदान रुपी आशीर्वाद भाजप- महायुती सोबत असावेत अशी विनंती केली.
या गावासाठी मुस्लिम स्मशानभूमी व भीमनगर येथील स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत बांधकाम, श्री जागृती हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधकाम, काशिनाईक तांडा, डिग्गेवाडी तांडा, टोपू तांडा , धनगर वस्ती येथे सिमेंट रस्ता, टोपू तांडा येथे गटार बांधकाम, धनगर वस्ती येथे बंदिस्त गटार बांधकाम, अंगणवाडी क्रमांक 90 दुरुस्ती, रेल्वे स्टेशन व दलित वस्ती येथे भूमिगत गटार बांधकाम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधकाम, रामलिंग मंदिरासमोर अंतर्गत सिमेंट रस्ता, अंगणवाडी क्रमांक 92 दुरुस्ती, लक्ष्मी मंदिर समोर व्यासपीठ बांधकाम, अक्कलकोट स्टेशन ते कडबगांव- नाविंदगी- नागणसूर- तोळपूर बॉर्डरपर्यंत रस्ता, रूपांतरील साठवण तलाव क्र. 2 अशी कामे केली आहेत.
त्याचप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा सोय, धनगर वस्ती समाज येथे समाज मंदिर बांधकाम, विरक्त मठ येथे व्यासपीठ बांधकाम, रामलिंग मंदिरासमोर सभामंडप बांधकाम, नवीन अंगणवाडी क्रमांक 89 बांधकाम, कडबगांव ते दोड्याळ मध्ये रस्ता सुधारणा या कामांना मंजुरी मिळालेली आहे.
यावेळी मोतीराम राठोड, महबूब मुल्ला, सिद्धाराम बाके, अविनाश मडीखांबे जाफर मुल्ला, विजय पाटील, अप्पू कविटगीमठ, महादेव बडूरे, गजानन उडचाण, भीमा तोरणगी, शिवानंद बिराजदार, शंकर निंबाळकर, बसवणाप्पा हिरेमठ, कयूम काझी, इराण्णा मलशेट्टी, तिप्पणा लोहार, शिवानंद नंदीकोले, गणपती सुतार मलकप्पा सुतार, महंत पाटील भाजप- महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.