अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने बाल कल्याण समिती बगीचा,श्रीशैल नगर,वैदू वस्ती येथे 100 विद्यार्थी लहान मुलांना सोबत दिवाळी साजरी करण्यात आली. फराळ वाटप करताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप मोठ्या प्रमाणात दिसत होते.
प्रमुख अतिथी म्हणून लैंगिकता शिक्षण प्रबोधक राहुल बिराजदार,महानगरपालिका निवृत्त शिक्षिका श्रीमती शोभा ममदापुरे,प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमिला उबाळे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश भाईकट्ट सुनंदा भाईकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
अंधकारावर मात करत जीवन प्रकाशमय कसं कराव हे दिवाळी सांगून जाते. समाजऋण फेडन्याछे अनुभव प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून ज्या घरात दिवाळी साजरी करता येत नाही अशांसाठी दिवाळी साजरी करत मुलांना फराळ वाटप करून माणुसकीची दिवाळी अनुभव प्रतिष्ठान करत आहेत.असे मत लैंगिकता शिक्षण प्रबोधक राहुल बिराजदार यांनी मांडले.
दिवाळी सणानिमित्त गरजू अनाथ आणि बेघर विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने शंकरपाळी, लाडू, चिवडा, चकली,करंजी असे फराळ यावेळी वाटप करण्यात आला.
सुत्रसंचालन गणेश येळमेली यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश कालदीप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कासट, शिवानंद नागणसुरे,संतोष शिवशिंपी,प्रसाद कालदीप,शंकर तालिकोटी,श्रवणकुमार नरोणे,शिवानंद भाईकट्टी,सोमनाथ कालदीप, कार्तिक तालीकोटी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.