सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथून दरवर्षी आषाढ महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील अरणला पांडुरंगाची पालखी जात असते. शेकडो वर्षा पासून ही परंपरा सुरु आहे. यंदाही ती पालखी गेली पाहिजे असे नियोजन शासन स्तरावर करणे संप्रदाय दृष्टीने महत्वाचे आहे. कारण प्रत्येक वारकरी भाविकाची श्रद्धा सांभाळणारी ही परंपरा आहे. हा वारकरी परंपरेतील महत्वाचा सोहळा आहे.
महाराष्ट्रात रेड झोन मधील कंटेनमेन्टझोन मधील दुकानें, व्यवहार, माणसांची ये जा सुरळीत चालू आहे.तर वारकरी परंपरा,आषाढ महिन्यातील पालखी सोहळा बंद का ? महाराष्ट्रात सर्व तीर्थक्षेत्र प्रवेश सुरु आहे. हा वारकरी भाविकांवर, संप्रदाय, परंपरेवर जाणीव पूर्वक अन्याय केला जात आहे. मुंबई मधील लोकल सुरु झाली.मार्केट मधील गर्दीवर नियंत्रण नाही. सर्व ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत.हा पक्षपातीपणा केला जात आहे.त्यामुळे
१९ जुलै रोजी संत सावता महाराज उत्सव अरण व १८ जुलै रोजी संत नामदेव महाराज उत्सव पंढरपूर, हे दोन्ही उत्सव नियम व अटी घालून लवकरात लवकर परवानगी देऊन सहकार्य करावे. संत नामदेव महाराज हे देवाचे लाडके भक्त असून वारकरी संप्रदाय पंजाब पर्यंत घेऊन जाणारे एकमेव संत आहेत. त्यामुळे हे करणेसाठी नियोजन होऊन परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन भाविक वारकरी मंडळ कडून मा. मुख्यमंत्री, मा उप मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प.सुधाकर इंगळे महाराज,राष्ट्रीय सचिव ह.भ. प.बळीराम जांभळे,जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.जोतिराम चांगभले, शहर अध्यक्ष ह.भ.प. संजय पवार व सर्व पदाधिकारी यांनी ईमेल द्वारे निवेदन दिले.