सोलापूर : प्रभाग 26 मधील लक्ष्मी बँक कॉलनी, विष्णुपुरी, सैफुल येथील नरेंद्र नगर. भागात कोरोना व सारीचे रुग्ण मिळून आल्याने प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी त्या नगरात स्यँनी टायझर व निर्जंतुककरणे जरुरी असल्याने त्याबद्दल अग्निशामक दलाचे अधीक्षक आवटे यांना सांगितले होते. त्याची त्वरित दखल घेऊन आवटे अग्निशामक दलातील गाडी उपलब्ध करून दिली. व वरील भागात सॅनिटायझरची फवारणी करून घेऊन वरील नगरात निर्जंतुकीकरन केले. त्यामुळे सदर नगरातील नागरिक यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले.