सोलापूर : प्रभाग 26 मधील विष्णुपुरी, कृष्णा कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर भाग 1 या नगरांमध्ये कोरोना/सारीचे रुग्ण आढळल्याने नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी अग्निशामक अधीक्षक आवटे यांना माहिती दिली त्याची त्वरित दखल घेत वरील भागामध्ये अग्निशामक दलाची गाडी बोलून घेऊन स्यँनीटायझर जंतुनाशक फवारणी करून सदर नगरांमध्ये निर्जंतुक करण्यात आले त्यावेळी त्या नगरातील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी नगरातील नागरिक जागीरदार साहेब, सादिगले, लक्ष्मण पाटील, अरुण कुलकर्णी, दुबे सर, ज्योती कुलकर्णी, वंना सर, घोळसगावकर, शिंपी सर, डॉक्टर कांबळे, शिंदे सर, करंकटे,जोशी आदींसह वरील नगरातील नागरिक उपस्थित होते.