सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी,बाणेगाव व कारंबा या गावात कोरोना चे रुग्ण आढळून आल्याने आ. यशवंत माने यांनी वरील गावाना अधिकारी व पदाधिकारी समवेत भेट देवून आढावा घेतला. यावेळी मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदारानी अचानक भेट दिली व आरोग्य केंद्रातील सोयी सुविधाबद्दल व उपलब्ध असलेल्या औषधाची माहिती घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या व विलिगीकरण केलेल्या रुग्णांच्या अडीअडचणीबाबत विचारपूस करुन गैरसोय होवू नये याबाबत संबधितांना सूचना केल्या आणि न घाबरता काळजी घेत काटेकोर पालन करावे असे आवाहन केले यावेळी मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आ.यशवंत माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक जितेंद्र साठे,मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे,पोलिस निरीक्षक सुहास जगताप,उ.सोलापूर पंचायत समिती चे उपसभापती जितेंद्र शीलवंत,राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बालाजी पवार, हरिभाऊ घाडगे मनोज साठे, बाणेगाव बाबासाहेब पांढरे विनोद पांढरे चंद्रकांत तोडकर सुरेश थोरात मल्लिनाथ तंबाके विनायक सुतार महेश पेंडपाले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कुलकर्णी,डॉ.पाथरुडकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाणसह कर्मचारी उपस्थित होते.