प्रिसिजन समूहातील कर्मचाऱ्यांच्या दहा टीमचा सहभाग
सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रिसिजन प्रीमियर लीग या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रिसिजन समूहातील कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा प्रत्येक वर्षी घेतली जाते.या स्पर्धा दि. ०२, ०९ आणि २३ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत सेंट्रल रेलवेच्या मैदानावर संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. दिनांक ०२ आणि ०९ ऑक्टोंबर रोजी लीग मॅचेस होणार आहेत तर दिनांक २३ ऑक्टॉबर रोजी सेमी फायनल व फायनल मॅचेस होतील.ग्रुप A आणि ग्रुप B असे दोन ग्रुप या स्पर्धेमध्ये आहेत. प्रत्येक गटात प्रत्येक संघास 3 सामने खेळावे लागतील, दोन्ही गटातून पहिले दोन संघ सेमी फायनल मध्ये जातील.
या स्पर्धेमध्ये भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
मॅन आफ द सिरिज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि प्रत्येक मॅचसाठी मॅन आफ द मॅच असे वैयक्तिक बक्षिसे असतील तर या स्पर्धेच्या विजेता व उपविजेता संघास प्रिसिजन ट्रॉफी देण्यात येईल.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड चे चेअरमन यतीन शहा प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा, मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे. आजच्या उद्घाटन प्रसंगी कपंनीचे वरिष्ट व्यवस्थापक सत्यविजय बारस्कर, एजिएम प्रदीप महिंद्रकर, योगीराज कुंभारे, पिआरओ विभागाचे माधव देशपांडे व अन्य कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.