सोलापूर : आजार हा व्यक्ती पाहून होत नाही. अशाचप्रकारे ‘सैराट’ फेम लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे याला मागील अनेक दिवसांपासून अॅपेंडिक्सचा त्रास होता. पण, त्याला मंगळवारी याचा खूपच त्रास होऊ लागल्याने तो मंगळवारी दाखल झाला. त्याचे अॅपेंडिक्सचे ऑपरेशन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात बुधवारी सकाळी झाले.
तानाजी गलगुंडे अर्थात लंगड्या याने आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. त्याला गेल्या अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. नुकतेच त्याला अॅपेंडिक्स
असल्याचे निदान झाले. तेव्हा अॅपेंडिक्सची गाठ ही ४-५ सेंटिमीटरची असल्याचे सांगण्यात आले होते. पण तेव्हा त्याने ऑपरेशन करणे टाळले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पोटात दुखू लागले. यामुळे त्याने याबाबत डॉ. अमेय ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तो थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. डॉ. अमेय ठाकूर, डॉ. आलिशा माथूर, डॉ. सागर पारगुंडे, डॉ. आडके यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली