श्री सिध्देश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदारांशी गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर पासून सुसंवाद साधणार असल्याचे वृत हाती येत आहे.
गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हत्तुर गावचे ग्रामदैवत सोमेश्वर बनसिध्देश्वर देवाच्या चरणी नारळ वाढवून मतदारांशी सुसंवाद साधणार आहेत यानंतर लगेचच सकाळी अकरा वाजता वांगी येथील ग्रामस्थांची सुसंवाद साधून पुढील राजकीय झंझावती दौरा निश्चित करणार आहेत.
एकदंर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात धर्मराजांची राजकीय इन्ट्री महत्त्वाची ठरणार असून विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडीला वेग येणार हे मात्र निश्चित आहे.