विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे,तशीच रंगत वाढताना दिसत असून,कालच बनशेट्टी व सुरेश पाटील यांची दिलजमाई होऊन काही तास उरकले नाही,शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बनशेट्टी व दोन पाटील यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमच्यापैकी कोणालाही विधानसभेचे तिकीट द्या म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांना जाहीर आवाहन दिले आहे
भारतीय जनता पार्टीचे माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी व मध्यप्रदेश संघटन मंत्री तथा पश्चिम महाराष्ट्र विधानसभेचे निरीक्षक अजय जमवाल काल संघटनात्मक दौऱ्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी महापौर शोभाताई बनशेट्टी,माजी सभागृह नेते सुरेश पाटील,माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील,सोलापूर विद्यापीठ सिणेट सदस्य संजय साळुंखे,भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार,भाजप अनुसूचित जमाती माजी शहराध्यक्ष अशोक कटके यांनी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत शहर उत्तर विधानसभेसाठी आमच्यापैकी कोणालाही ही विधानसभेचे तिकीट द्या आम्ही एकदिलाने काम करून भाजपचा आमदार निवडून आणू म्हणत शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा नवा चेहरा देण्याची मागणी केली असून येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांना भेटून आम्ही आमची तिकीटाची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभेला घटलेले मताधिक्य व भाजपमधील जुने नेत्यांनी एकत्रित येऊन दिलेले आवाहन भाजपला येणाऱ्या काळात अडचणीचे ठरणार असून,भाजपचे वरिष्ठ मंडळी कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
याप्रसंगी सहकार भारतीचे श्रीशैल बनशेट्टी,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने,भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे,भाजयुमो शहर उपाध्यक्ष विजय कूलथे,सचिन शिवशक्ती व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते