सोलापूर : भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थे च्या संस्थापिका व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना सोलापूर महिला शहराध्यक्ष मातंग समाज संघ जिल्हाअध्यक्षा सौ प्रणोती शशिकांत जाधव यांच्या वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांना महिला बचत गटांचे थकीत हफ्ते माफ करण्यात यावेत याविषयी च्या मागणीचे निवेदन आज देण्यात आले.कोरोना महामारीच्या जागतीक संकटात लोकांना रोजगार नाही हाताला काम नाही ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांची उपासमार होत आहे.
मातंग वस्तीतील बर्याच महिला धुणं-भांडी करतात एस.टी.स्टॅन्ड वर फळे,भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करतात काही जण हमाली,रिक्षा चालवून आपले कुटुंब चालवतात कोरोना मुळे हे सर्व व्यवसाय बंद पडले आहेत आंणि अशातच खाजगी महिला बचत गटांचे कर्मचारी प्रत्येक वस्तीत जाऊन हफ्ते भरा असा तगादा लावत आहेत हि बाब लक्षात घेऊन आज भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थे च्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागणी केली. भारतीय जनता पार्टी च्या लोकप्रिय नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी हि हफ्ते माफ करावे अशी जिल्हाधिकारी यांना विनंती केली यावेळी मातंग समाज संघ सोलापूर शहराध्यक्ष मा.विशाल लोंढे एल.पी.ग्रुप चे संस्थापक विकी पवार शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.