सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी या गावात राज्य मंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षारोपनात एकूण 20 ते 25 झाडे लावण्यात आली. विशेष म्हणजे कोणाचा आधार नसण्यारा अपंग,निराधार तसेच ज्येष्ठ महिला व पुरुषांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.यावेळी येथे उपस्थित प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पुरी,कौठाळी प्रहार शाखा प्रमुख सोमनाथ माळी व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते