सोलापूर : गुरुपौर्णिमे निमित्त आयोजित बैठकी मध्ये वारकरी संप्रदायाच्या विविध प्रश्न व परंपरे विषयी चर्चा करण्यासाठी मान्यवर महाराज, पदाधिकारी उपस्थित होते. विविध प्रश्नांना सोडवन्यासाठी चर्चा करण्यात आली. संघटना वाढीसाठी क्रियाशील कार्यकर्ते गरजेचे असतात म्हणून ह भ प जोतिराम चांगभले यांनी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या राष्ट्रीय सचिवपदी ह भ प बळीराम जांभळे यांची नियुक्ती करणेत यावी अशी सूचना मांडली. त्यावर लक्ष्मण देविदास यांनी अनुमोदन दिले. त्या नंतर उपस्थित सर्व पदाधिकारी, भाविकांनी नियुक्तीला सामूहिक अनुमोदन दिले. त्यानंतर संघटना वाटचालीसाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे. त्या त्या सर्व करण्यासाठी प्रयत्न करणे संबंधी चर्चा झाली.राष्ट्रीय सचिवपदी बळीराम जांभळे यांची नियुक्ती ह,भ,प.सुधाकर इंगळे महाराज(राष्ट्रीय अध्यक्ष )यांनी केली.त्यामुळे त्यांचा सत्कार ह भ प संजय पवार ,ह,भ.प.ज्योतिराम चांगभले,ह भ प मोहन शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.गुरुपौर्णिमे निमित्त घेतलेली बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी व संत मुक्ताई पूजन करून सुरु करण्यात आली. या बैठकिला ह.भ.प.अभिमन्यु डोंगरे महाराज, ह,भ,प.अनंतबापु इंगळे महाराज, ह,भ.प.ज्योतिराम चांगभले, कुमार गायकवाड, ह.भ.प.तानाजी बेलेराव, लक्ष्मण देवीदास, किरन कुलकर्णी ,महेश चोरमुले,संजय केसरे, बाळासाहेब चटे, बसवेश्वर जाधव, भाऊसाहेब बेलेराव,किशोर धायगुडे, शेखर फंड, तसेच भाविक, पदाधिकारी हजर होते.,ह,भ.प.ज्योतिराम चांगभले यांनी प्रास्ताविक केले. ह.भ.प.मोहन शेळके यांनी सूत्रसंचालन केले. ह.भ.प.संजय पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. पसायदान घेऊन बैठकीची सांगता करणेत आली.या नियुक्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून शुभेच्छा येत आहेत.