येस न्युज नेटवर्क : चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल हे भारतीय दिग्गज फेल ठरले, तर यशस्वी जैस्वालने 56 धावांची खेळी केली. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतनेही चांगला प्रयत्न करत संघासाठी 39 धावा केल्या, मात्र पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अश्विनने अप्रतिम कामगिरी करत शानदार फलंदाजी करत शतक ठोकले.
रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दमदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावले. अश्विनने अप्रतिम खेळी केली. त्याने रवींद्र जडेजासोबत १८० हून अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली आहे. टीम इंडियाची सुरुवात खराब होती झाली. मात्र यानंतर जडेजा आणि अश्विनने डावाची धुरा सांभाळली. त्याने अवघ्या १०८ चेडूंत शतक झळकावत भारताचा मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यामुळे भारतााने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८० षटकानंतर ६ बाद ३३९ धावांपर्यंत मजल मारली आहे.
अश्विनचे कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक –
बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अश्विन भारताकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. अश्विनने दमदार फटकेबाजी करत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर आले आहेत. अश्विनने १०८ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. ज्यामध्ये त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. तो आता १०२ आणि रवींद्र जडेजा ८६ धावांवर नाबाद परतले आहे.