सोलापूर – दिव्यांगांची कार्यकुशलता, एकाग्रता
आणि सातत्य याची अनुभूती मला माझ्या शैक्षणिक पर्वात जवळून घेता आली. सॉफ्टवेअर तयार करण्याची कुशलता मी पाहिली. दिव्याग विद्यार्थ्याना शिकवणाऱ्या, घडवणाऱ्या व संस्कारित करणाऱ्या शिक्षकांची महानता अलौकिक आहे असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काढले. रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागतोपर सत्कार केला.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन गौरविले. त्यानंतर शाळेतील सर्व कर्मचारी वृंदांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास रोटरी नॉर्थ चे अध्यक्षा डॉ जानवी माखिजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, दीपक आरवे,भैरुरतन दामानी अंध शाळेचे सचिव संतोष भंडारी, दौलत सिताफळे, अण्णासाहेब कोतली, सुभाष जाधव, संजय चौगुले, डॉ किरण सारडा, आसावरी सराफ, डॉक्टर सुदीप सारडा, संजय पटेल मधुरा वडापुरकर, नमिता पाटील, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, गजानन गडगे, नागनाथ बसाते, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, गंगाधर मदभवी, अजित पाटील, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेणुरे, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.