सोलापूर : शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक मध्ये निरुपणकार विवेक घळसाची यांनी बुधवारी पालक आणि विद्यार्थ्यांना संस्कार तसेच चारित्र्याचे धडे शिकविले.
स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी घडसाशी हे पालकत्व इंद्रधनुष्य नव्हे शिवधनुष्य या विषयावर बोलत होते. लहान मुलांना वयाच्या सात वर्षापर्यंत आपण जे संस्कार देतो त्यातूनच मुले शिकत असतात. आपली बोलण्याची भाषा, आपली वेशभूषा यावरून आपल्या चारित्र्याची ओळख होते. सर्वत्र भयानक परिस्थिती आहे त्यामुळे संस्कार आणि चारित्र्य याकडे पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे आणि भारताची सेवा करावी असे ते म्हणाले.
प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळ कुमठेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. डॉक्टर सतीश वळसंकर यांनी ब्रह्मदेव माने आणि भैय्यासाहेब वळसंगकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सतीश वळसनकर, माजी नगरसेवक बाळासाहेब माने, प्रिया माने, स्वाती माने आदी उपस्थित होते