सोलापूर: राज्यातील सरकार हे गोरगरिबांचे आपले सरकार आहे. याची जाण ठेवत इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा जनतेने लाभ घ्यावा. असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
इतर मागास बहुजन कल्याण वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनेची माहिती देण्याकरता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक संचालिका मनीषा फुले, गटविकास अधिकारी जास्मिन शेख, सचिन चव्हाण, महेश सरवदे, विठ्ठल वानकर अश्विनी चव्हाण, अभियंता प्रेम राठोड, संतोष भाकरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मनीषा फुले यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांनी लाभ घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यालय प्रमुख शितल कंदलगावकर, शिवाजी नाईक यांच्यासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर येथील सर्व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, तसेच सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी घटकातील लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिस्किटे यांनी तर अश्विनी चव्हाण यांनी आभार मानले.