मुंबई : महाराष्ट्रमध्ये अस्वस्थता आहे. महिलांवार अत्याचार वाढत आहे. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं महाराजांचा पुतळा कोसळला. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. जोरदार वाऱ्याने राज्यापालांची टोपी कधी उडाली नाही. महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केला आहे. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होतेय
कोकणवासियांना आता कळलं असेल . स्मारकारच्या कामात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालाय. पुतळा उभरण्याचे टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार आहे. जे मालवणला रस्ता आडवून बसले ते शिवद्रोही होते. शिवद्रोही आडवे आलेत. हे इतके मस्तवाल झाले की कोणतीही भीडभाड न बाळगत नाही त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसले आहे. किल्ल्यावर रस्ता अडवणारे मोदी, शाहांचे दलाल आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रविवारी गेट वे ऑफ इंडियाला जोडे मारो आंदोलन : उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चा काढला तिथे रस्ता मोदी शाह यांच्या दलालांनी अडवला . हा पुतळा पडला कसा? केसरकर जे बोलताय ते संतापजनक आहे. येत्या रविवारी दुपारी वाजता हुतात्मा स्मारक हून गेट वे इंडिया पर्यंत जाणार आहोत. जोडे मारो आंदोलन आम्ही करत या सरकारचा निषेध करणार आहोत.