सोलापूर दि.26 (जिमाका):- शेत शिवारातील आरोग्य विषयक महत्व सर्वसामान्य नागरीकांना होण्यासाठी व उत्पादक ते ग्राहक अशी विक्री साखळी व्यवस्था बळकट करण्यासाठी कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक यांनी दिली.
सोलापूर जिल्हयातील शेतक-यांनी त्यांचे शेतावरील रानभाज्या प्रदर्शन व विक्रीसाठी महोत्सवात आणाव्यात. तसेच सोलापूर शहर व नजीकचे नागरीक व ग्राहकांनी सदरच्या महोत्सवास भेट द्यावी तसेच रानभाज्यांची खरेदी करावी. तसेच आरोग्यदायी रानभाजी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि व आत्मा विभागामार्फत करण्यात आले आहे.
सदर महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे.