सोलापूर : प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे व आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सोलापूर शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कामगार, झाडूवाली, बिगारी, आशा वर्कर्स, परीचारिका यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने छत्री वाटपाचा कार्यक्रम दि. 26 जून 2020 रोजी सकाळी दहा वाजता सो.म.पा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयाच्या जवळ प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर,बुधवार सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळा या दिवसामध्ये सुद्धा कोरोना या महामारीला रोखण्यासाठी सोलापूर महापालिकेचे सफाई कर्मचारी ,झाडूवाली ,बिगारी ,आशा वर्कस, परिचारिका हे काम करत असून यांना पावसापासून संरक्षण मिळावे या हेतूने व सामाजिक बांधिलकी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते छत्री वाटपाचाह कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे बबन शिंदे ,विकी चवरे, आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे,जितू मोरे, राहुल म्हेत्रे,पांडुरंग सोनवणे, एस.बी कुलकर्णी, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे अध्यक्ष बंटी माने, भारत बाबरे यश कांबळे आदी उपस्थित होते.