सोलापूर: सोलापूर । विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अण्णपा सतूबर यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी डॉ. संतोष राठोड, उपाध्यक्षपदी स्वाती पुंजाळ, नागेश बिराजदार व किरण चव्हाण यांची तसेच सचिव पदी प्रसाद गाजरे यांची निवड करण्यात आली. ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील, विजय शाबादी, बाबूराव लद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रस्ट अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. प्रारंभी ट्रस्ट सचिव विश्वनाथ आमणे यांनी प्रास्ताविक केले. तसेच मंडळातर्फे कै. राजेश शाबादी यांचे स्मरणार्थ उज्ज्वला दफेदार या अपंग विद्यार्थिनीस डि बी.एम. शिक्षणासाठी ११ हजार दिल्याचे सांगितले.
इतर पदाधिकारी
खजिनदार – राचप्पा कटारे, मिरवणूक प्रमुख : बसवराज स्वामी, प्रमुख सल्लागार – प्रशांत जोशी, पद्माकर कुलकर्णी, उमेश कदम महिला समिती – सुरेखा गोब्बुर, ज्योती केगावकर, वैशाली माशाळ, मधुमती चाटे, भोसले, मीना गायकवाड, सुजाता म्हेत्रे, सल्लागार – बेळुनगी बिराजदार, उमेश यळसंगी, मदन पोलके, डॉ. बसवराज बगले, मल्लिनाथ याळगी, सुनील भगवान, महेश देवकर, सचिन चव्हाण, पुरुषोत्तम साखरे, महेश घाडगे, शिवराज कांबळे, सचिन चौधरी, संदीप साळुंके आदी.